अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तब्बल 22 रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या या 22 जणांचा अखेरचा प्रसासही वेदनादायी होता. या संपूर्ण प्रकारामुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.
काल नेमके काय झाले?
दैनिक विवेकसिंधूचे मालक, संपादक बाळू गाठाळ हे काल दुपारी अडीचच्या सुमारास स्वाराती रुग्णालय येथे गेले होते. त्याठिकाणी एका रुग्णवाहिकेत 22 आणि दुसऱ्या रुग्णवाहिकेत सहा मृतदेह ठेवले होते. साडे चारला अंत्यविधी सुरू झाले. बाळू स्वत: तिथे तीन तास उपस्थित होते. मयतांचे काही नातेवाईकही तेथे उपस्थित होते. नातेवाईक दुखात असल्याने त्यांचं लक्ष याठिकाणी गेलं नसावं. आजही 10 मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून नेण्यात आले.