यवतमाळ:
महाविकास आघाडी सरकारचा महत्वाची योजना असणाऱ्या शिवभोजन थाळीसंदर्भात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य सरकारने शिवथाळी भोजन (Shivbhojan Thali Yavatmal)गरीब नागरिकांसाठी सुरू केले. परंतु यवतमाळ (Yavatmal)जिल्ह्यातील एका केंद्रातील भयाण वास्तव समोर आले आहे. या केंद्रात ग्राहकांना दिली जाणारी थाळी शौचालयातील पाण्याने धुतली जात आहे. संबंधित शिवभोजन केंद्रावरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
महागांव तालुक्यातील इजणी येथील त्रिमूर्ती महिला बचत गट करून शिवभोजन केंद्र चालवले जातो. या केंद्रासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्यांना शौचाल्यास वापरल्या जाणाऱ्या पाण्याने धुतल्या जात आहेत. त्यामुळे शिवभोजन केंद्रात चक्क शौचालयाच्या आत थाळ्या धुत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
शिवभोजन केंद्रातील हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली. विशेष म्हणजे हे शिवभोजन थाळी केंद्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीचे असल्याचे वृत्त आहे. परंतु केंद्रात गलिच्छ जागेवर भांडी धुऊन त्याच थाळीत पुन्हा भोजन दिले जात असल्याने सरकार एक प्रकारे गरिबांची थट्टाच करत असल्याचे दिसून येत आहे.