India

शिवसेना खासदाराची संसदेत पुरग्रस्तांच्या नुकसान भरपाई मागणी… केंद्रीय कृषीमंत्री म्हणाले

Published by : Lokshahi News

राज्यात गेल्या वर्षी म्हणजे जून ते ऑक्टोबर 2020 दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात एनडीआरएफ मधून अर्थसहाय्य करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे एका निवेदनाद्वारे केली होती. य़ा निवेदनावर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी पिकांच्या नुकसानीसाठी 701 कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

लोकसभेत आज उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गेल्या वर्षी म्हणजे जून ते ऑक्टोबर 2020 दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात एनडीआरएफ मधून अर्थसहाय्य करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे एका निवेदनाद्वारे केली होती. या प्रश्नाला उत्तर देताना नरेंद्रसिंह तोमर यांनी महाराष्ट्राला देण्यात येणाऱ्या मदतीची माहिती दिली. पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्राने 700 कोटी रुपये मंजूर केले आहेत, असं तोमर यांनी सांगितलं.

गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीनंतर नुकसान भरपाईपोटी 3721 कोटींची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली होती. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने निर्णय घेवून 4375 कोटी शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी वाटप केले. राज्याने केलेल्या 3721 कोटी रुपयांच्या मागणीपैकी 701 कोटी रुपये मदत देण्याचे आज केंद्र शासनाने घोषित केले आहे. अशी माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली

दरम्यान राज्यातून कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सध्याच्या नुकसानीसाठी देखील तातडीने मदतीची विनंती केली.गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोकण तसेच इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात राज्य सरकारतर्फे केंद्राला आर्थ‍िक मदतीची विनंती करणार असून केंद्र सरकार याची योग्य ती दखल घेवून तातडीने मदत करेल अशी अपेक्षा कृषी मंत्री भुसे यांनी व्यक्त केली आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news