India

हरियाणात शिवजयंती उत्साहात साजरी

Published by : Team Lokshahi

कर्नाल दादूपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज वेल्फेअर संघ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ॲड. राजसाहेब पाटील, सर्वोच्च न्यायालय, नई दिल्ली व जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी गणेशानंद जी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र बाहेर मोठ्या प्रमाणात साजरी होणारी शिव जयंती (shiv Jayanti) स्फुर्ती देणारी आहे, अशी भावना ॲड. राजसाहेब पाटील ह्यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.


आयोजक अध्यक्ष राजबीर दाभाडे जी, दादूपूरचे सरपंच, सचिव श्री जगबिर सिंग जी मराठा, आदींनी कर्नाल,पानिपत,कुरुक्षेत्र, रोहतक स्थित रोड मराठा समाजातर्फे व छत्रपती शिवाजी महाराज वेल्फेअर संघ यांच्या तर्फे शिव जयंती (shiv Jayanti)  मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. ह्यावेळी संपूर्ण भारतातून शिव प्रेमी उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने सिने व्यावसायिक दिपक चौधरी,मुंबई, आंध्र प्रदेशचे राष्ट्रीय समरसता मंच चे राष्ट्रीय महासचिव कृष्णकिशोर जी, छत्रपती शिवाजी स्वराज्य मिशन, दिल्ली चे अध्यक्ष ॲड. व्ही एस खामकर तसेच शेकडो रोड मराठा बांधव ह्या शिव जयंती  (shiv Jayanti) उत्सवात सामील झाले होते.

IPL Mega Auction 2025 Live: राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू देवदत्त पडिक्कल अन्सोल्डवर!

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव