आज सलग तिसऱ्यादिवशी शेअर बाजाराच्या निर्देशकात घसरण झाली. सेन्सेक्स 355 अंक (-0.68%) घसरणीसह 52198 वर बंद झाला. निफ्टी 120 अंकांच्या घसरणीसह (-0.76%) 15632 च्या पातळीवर बंद झाला. गेल्या तीन व्यापार सत्रांमध्ये सेन्सेक्स 960 अंकांनी घसरला.
बाजाराच्या शेवटी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचं बाजारमूल्य घसरून 231.01 लाख कोटींवर आलं. 15 जुलै रोजी ही बाजारपेठ 233.86 लाख कोटी रुपये होती.