शेअर बाजार उघडताच सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ५७ हजारांच्या पार गेला. पहिल्यांदाच सेन्सेक्सने ५७ हजारांचा पल्ला गाठला आहे. महिन्याभरात सेन्सेक्समध्ये ४ हजार अंकांची वाढ झाली आहे. शेअर बाजारात असाच उत्साह दिसला तर ऑक्टोबरपूर्वी सेन्सेक्स ६० हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सकाळच्या सत्रात निफ्टी १७ हजारापर्यंत पोहोचला होता. निफ्टीची आतापर्यंत सर्वात मोठी वाढ आहे. आज टाटा स्टील, रिलायन्स, व्होडाफोन आयडिया, एअरटेल, मारूती,ईजी ट्रिप प्लानर्स, एलअँडटी आणि एक्सिस बँकेच्या शेअर्सवर नजर असणार आहे. आज बीएसईवर लिस्टेड एएफ इन्टरप्राजेज, एजेल, धरानी शुगर्सस अँड केमिकल्स, इंडियन सूक्रोज, न्यूटाइम इन्फ्रा, ऑप्टो सर्किट्स, सूरतवाला बिझनेस ग्रुप, स्माईलडायरेक्ट क्लब आणि सिधु ट्रेड लिंक्स यांचे आर्थिक परिणाम येणार आहेत.