Crime

मुंबईत सेक्स टुरिझम रॅकेटचा पर्दाफाश

Published by : Lokshahi News

केदार शिंत्रे
मुंबई गुन्हे शाखेने सेक्स टुरिझम रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यात दोन जणांना अटक करण्यात आली असून दोघांची सुटका केली आहे.

पोलिसांनी जारी केलेल्या प्रेस नोट नुसार, सन 2020 मध्ये अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत अटक करण्यात आलेली एक महिला तिच्या साथीदारासोबत सेक्स टुरिझम रॅकेट चालवत असल्याची विश्वसनीय माहिती त्यांना मिळाली होती. यानंतर सापळा रचण्यात आला. बनावट ग्राहक बनून पोलिस अधिकाऱ्यांनी गोवा सहलीचे आयोजन केले.

गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून मुंबई विमानतळावर दोन महिलांना अटक केली आणि या व्यवसायात ढकलल्या जाणाऱ्या दोन महिलांची सुटका करून त्यांना निवारा गृहात पाठवले आहे. अटक केलेल्या महिलेविरोधात भादंवि कलम 370 (2) (3) आणि पीटा कलम 4,5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे आरोपी ग्राहकांसोबत करार निश्चित झाल्यावर त्यांना महिलांसह भारतातील विविध पर्यटनस्थळांवर पाठवायचे. गोवा हे त्यांचे आवडते ठिकाण होते. आरोपी आधी मुलींचे फोटो ग्राहकांना पाठवायचे. मुलीला पसंत केल्यानंतर, ग्राहकांना गोवा किंवा इतर ठिकाणांची फ्लाइट तिकिटे स्वतः बुक करावी लागत असे.

ही टोळी दोन दिवसांचे ग्राहकांकडून 50 हजार रुपये घेत असे. अटक केलेले आरोपी त्या मुलींकडून 20 टक्के दलाली घेत असत. यानंतर ग्राहक आपल्या आवडत्या मुलीसोबत दोन दिवस गोव्याला जायचा आणि नंतर दोघेही मुंबईला परत यायचे.

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका