कोरोनाव्हायरस महामारीच्या दुस-या लाटेच्या प्रभावातून आर्थिक व्यवहार सावरल्यामुळे भारताची निर्यातीची टक्केवारी गेल्या वर्षीच्या सप्टेंबर पेक्षा 21.35% ने वाढली. डॅलर्स मध्ये हि आकडेवारी ३३.४४ अब्ज एवढी आहे.
वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार सप्टेंबरचा 2019 च्या महामारीपूर्व काळापेक्षा चालू आर्थिक वर्षात सप्टेंबरमध्ये निर्यातीचे मूल्य 28.5% सुधारले आहे.
सप्टेंबर २०१९ च्या तुलनेत, अभियांत्रिकी वस्तू, पेट्रोलियम उत्पादने, रत्ने आणि दागिने यांची निर्यात, सेंद्रिय आणि अजैविक रसायने, सूती धागा, कापड आणि हातमाग उत्पादने, इत्यादींच्या निर्यातीत 20% ते 40% पर्यंत वाढ आहे.