Crime

हॉटेलच्या कर्ज घोटाळाप्रकरणी स्टेट बँकेचे माजी अध्यक्ष प्रतीप चौधरी यांना अटक

Published by : Lokshahi News

जैसलमेरमध्ये खासगी हॉटेलच्या कर्ज प्रकरणी घोटाळा झाला, आणि घोटाळ्याप्रकरणी एसबीआयचे माजी अध्यक्ष प्रतीप चौधरी यांना जैसलमेर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर आलोक धीर, एसव्ही व्यंकटकृष्णन, आरके कपूर, देवेंद्र जैन, ससी मेथाडिल, तरुण आणि विजय किशोर सक्सेना यांच्याविरुद्ध जैसलमेरच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते.

खासगी हॉटेलच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी एसबीआयचे माजी अध्यक्ष प्रतीप चौधरी यांना पोलिसांनी दिल्लीतील घरातून अटक केली. त्यानंतर चौधरी यांना सोमवार जैसलमेर येथे घेवून येणार आहेत. हे प्रकरण गोदावन समूहाच्या मालकीच्या मालमत्तेशी संबंधित असून, जिथे २०० कोटी रुपयांच्या मालमत्तां २४ कोटी रुपयांना विकली गेली. दरम्यान त्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँकेने ही सर्व मालमत्ता जप्त केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैसलमेरमध्ये बांधण्यात येत असलेल्या हॉटेलच्या बांधकामासाठी गोदावन समूहाने २००८ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाकडून २४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. पण जेव्हा हॉटेल समूह त्याची परतफेड करू शकला नाही, तेव्हा एसबीआयने हॉटेल समुहाचे बांधकामाधीन आणि त्याचे एक चालू हॉटेल जप्त केले होते, त्याला नॉन-परफॉर्मिंग अ‍ॅसेट म्हणून वागणूक दिली होती. त्यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रतीप चौधरी होते.

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news