रशियानेच हायपरसोनिक मिसाइल डागल्याचा दावा केला आहे. किंझल हायपरसोनिक मिसाईल वापरून आम्ही युक्रेनच्या मिसाईल आणि विमानांच्या शस्त्रांचे मोठे भांडार उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. किंजल नावाचे रशियाची हे मिसाईल ध्वनीच्या वेगापेक्षा १० पट जास्त वेगाने जाते.किंझल हायपरसोनिक मिसाईल वापरून आम्ही युक्रेनच्या मिसाईल आणि विमानांच्या शस्त्रांचे मोठे भांडार उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे.
रशियाचे व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांचा संयम आता सुटत आहे. युक्रेन-रशियात गेल्या २४ दिवसांपासून सुरु असलेले युद्ध संपवण्यासाठी पुतीन अणूबॉम्बचा वापर करु शकतात, असे अमेरिकेने म्हटले आहे.
रशियाने सर्वात खतरनाक हायपरसोनिक मिसाईल डागल्याने खळबळ उडाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा संयम आता सुटत चालला असून पुढे ते अणुबॉम्बही टाकायला मागे पुढे पाहणार नाहीत, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. हा हल्ला रशियाचा पाचवा जनरल युक्रेनमध्ये मारला गेल्यानंतर करण्यात आला आहे. यामुळे अमेरिकेने रशिया अण्वस्त्रांचा वापर करणार असल्याचा इशारा दिला आहे.