India

russia-Ukraine war | भारतासाठी रशियाने युद्ध थांबल्याचा दावा चुकीचा

Published by : Shweta Chavan-Zagade

युक्रेनमधील खारकीव्ह (Russia Ukraine War)शहरात अडकलेल्या भारतीय भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी रशियाने सहा तास युद्ध थांबवल्याची बातमी देशातील प्रमुख वाहिन्या आणि वृत्तपत्रात झळकली होती. यावर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण देत या वृत्ताचा इन्कार केला. यासंदर्भात प्रसारित झालेल्या बातम्या चुकीच्या असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी टि्वट करत सांगितलं आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, या संबंधी ज्या काही बातम्या प्रसारित झाल्या त्या चुकीच्या आहेत. केवळ रशियाच नव्हे युक्रेननेही भारतीय नागरिकांना सुरक्षित काढण्यासाठी मदत केली.

युक्रेनवर हल्ले सुरु (russia-Ukraine war) करण्याच्या घटनेस आता आठ दिवस लोटले आहेत. या आठ दिवसांत रशियाला जबर नुकसान सहन करावे लागले असून युक्रेनच्या मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान युक्रेन-रशियालगतच्या (russia-Ukraine war) पूर्व आणि ईशान्य भागात सुमारे चार हजार भारतीय (Indian Student) अडकून पडले. यापैकी बरेच विद्यार्थी हे युक्रेनच्या खारकीव्ह शहरात अडकून पडलेत. खारकीव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी रशियाने ६ तास युद्ध थांबवण्याचे मान्य केले आहे. तिथे अडकलेल्या भारतीयांना खारकीव्हपासून (Kharkiv) युक्रेनच्या आजूबाजूच्या देशांच्या सीमेवर सुरक्षितपणे नेण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सोशल मीडियावरील (social media ) काही ट्विटमधून हा दावा करण्यात आला होता.

रशिया आणि युक्रेन (russia-Ukraine war) संघर्षामध्ये भारताची भूमिका तटस्थ राहिली आहे. 'रशियाचे 'नाटो'शी (Russia's NATO) असलेले मतभेद चर्चेतूनच सोडविता येऊ शकतात,'असं सांगत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (President Vladimir Putin) यांच्याकडे देशाची भूमिका स्पष्ट केली होती. भारताने हा संघर्ष सुरु झाल्यापासून रशियाने केलेल्या हल्ल्याबद्दल फार थेटपणे कोणतही व्यक्त केलेलं नाही. मात्र बुधवारी सायंकाळी पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्याशी संवाद साधला. यामध्ये प्रामुख्याने खर्कीव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांबद्दल चर्चा झाली. या फोन कॉलनंतर लगेच खर्कीव्हवरील हल्ले रशियाने काही तास बंद केले.

बुधवार सायंकाळपासून रात्रीपर्यंत रशियन हवाईदलाने खर्कीव्हवर बॉम्ब (Bomb on Kharkiv) हल्ला केला नाही. त्यामुळेच दिल्लीला दिलेला शब्द पाळण्यासाठी जगात कोणाचंही न ऐकणाऱ्या रशियाने सहा तास युद्ध रोखून धरल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगलीय. राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील तज्ज्ञ असणाऱ्या नितीन गोखलेंनी (nitin gokhale) ट्विटरवरुन युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी रशिया 'मानवतावादी दृष्टिकोनातून मार्ग'तयार करण्यात आल्याचं सांगितलं. खर्कीव्हमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सहा तासांचा अवधी दिला होता. बुधवारी सायंकाळपासून रात्री साडे अकरापर्यंत रशियाने खर्कीव्हवर हल्ला केला नाही.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha