Crime

वर्ध्यात दरोडा; दाम्पत्यावर चोरट्याचा चाकूहल्ला

Published by : Lokshahi News

भूपेश बारंगे वर्ध्यातील कारंजा येथील शिक्षक कॉलनी मधील मधूकर भोयर यांच्या घरात सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान तीन जणांनी दरवाजाच्या बेल वाजवून घरात प्रवेश केला. तीन चोरट्यानी भोयर यांना ढकलत बेडरूममध्ये नेऊन पतीपत्नीला बांधण्यात आले पत्नी शरयू भोयर यांच्या हातपाय बांधण्यात आले त्यानंतर दोघांचे तोंड बांधण्यात आले. भोयर यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र व बोटातील अंगठी हिसकावली आणि कपाटात असलेलं मंगळसूत्र नेलं तर मुरलीधर भोयर यांच्या गळ्यावर सत्तूर लावले आणि तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात सोन आहे त्या सोन्याची मागणी केली. मात्र त्यांनी सोन्याचे दागिने नसल्याचे सांगितले एका कपाटात 20 हजार नगदी असलेले त्यांनी सांगितले तेही त्या चोरट्याने घेतले. घरात काही तास दरोड्यांचा धुमाकूळ राहिला. यात मुरलीधर भोयर यांच्या हाताला चाकू मारल्याने गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाली आहे.


दोघांच्या गळ्यासमोर सत्तूर ठेवून त्यांना जीवाशी ठार करण्याची धमकी दिली.घरात असलेलं सोन संपूर्ण देण्याची मागणी केली. मात्र भोयर दाम्पत्यानी हळदी कुंकूला आणलेला ऐवज आजच बँकेत लॉकर मध्ये नेऊन ठेवलं. जवळपास घरात चोरट्यानी दीड तास धुमाकूळ घातला होता यात महिलेच्या छातीवर बसून त्यांनी तोंड बांधले हात पाय बांधून घरातील सर्वच ठिकाण बघितले कपाट उघडून दागिन्यांचा शोध घेतला मात्र चोरट्यांचा हाती दोन मंगळसूत्र व रोख मिळाली त्यानंतर चोरटे पसार झाले. चोरटे घराचा दरवाजा बाहेरून बंद करून व तीन मोबाईल घेऊन पळाले. भोयर यांनी घराशेजारील मुलीला कसाबसा आवाज दिला आणि ही घटना उघडकीस आली.काही वेळातच चोरटे मात्र पोबारा झाले होते.

भोयर दाम्पत्याचा चोरट्याला विनवणी
आमच्या घरातलं सर्वच न्या पण आम्हाला मारू नका अशी विनवणी केली. भोयर यांना जीवाशी ठार करण्याची धमकी दिली यात दोघेही घाबरले आणि आमच्या घरात असलेले सगळं तुम्ही घेऊन जा अस म्हणत एटीएम कार्ड देतो, त्याचा कोड नंबर देतो, लॉकर चाबी देतो आमच्या घरात असलेलं सोन आजच लॉकर मध्ये नेऊन ठेवलं अस सांगितल्यावर चोरट्यांचा विश्वास बसत नव्हता तरी ते दाम्पत्याना धमकावत होते.काही वेळाने जेवढ मिळाले तेवढं नेलं आणि एका चोराला गाडी आण असे सांगितले आणि घराचा दरवाजा बाहेरून लावून निघून गेले.

घश्याला कोरड लागल्याने…चोरट्याने पाजले पाणी
चोरट्यानी भोयर यांच तोंड बांधले होते तर त्यांच्या गळ्यावर चाकू ठेवला होता त्यात धमकावत असल्याने भोयर यांचा घसा कोरडा झाल्याने त्यांनी पाणी पाजण्याची विनंती केली यात एका चोरट्याने त्यांना पाणीही पाजले. यात तो चोरटा चांगला होता असे मुरलीधर भोयर यांनी सांगितले.

हळदी कुंकूला आणलेला सोन सकाळी ठेवलं लॉकरात
भोयर यांनी मोठया प्रमाणात असलेले सोनं बँकेच्या लॉकरातून काढून आणले काही दिवस हळदी कुंकू असल्याने सोन्याचे दागिने घरी ठेवले होते मात्र दरोडा पडण्याच्या दिवशी सकाळी बँकेतील लॉकरमध्ये सोन्याचे दागिने नेऊन ठेवले मात्र तेच सोन्याचे दागिने चोरटे मागत असल्याचे भोयर दाम्पत्य सांगत होते.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...