कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच अचानक रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध ३० सप्टेंबरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) घेतला आहे.
देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी विमानांवरील गेल्या १७ महिन्यांपासून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून ती ३० सप्टेंबरपर्यंत कायम करण्यात आली आहे.
हे निर्बंध ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत कायम राहतील. त्यानंतर विमानसेवा सुरु होणार की नाही हे मात्र तेव्हाच्या परिस्थिवरून ठरविण्यात येणार असल्याचे डीजीसीए करुन सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मालवाहू (कार्गो) विमानांचे प्रचलन कोणत्याही बांधनांविना सुरू राहील. शिवाय, निवडक आंतरराष्ट्रीय मार्गांवर नियोजित फेऱ्या मर्यादित स्वरूपात चालविण्यात येतील. त्याचा निर्णय 'केस टू केस' तत्त्वावर प्राधिकरणाकडून घेतला जाईल.