India

सीएच्या सोशल मीडियाच्या पोस्टचे होणार ऑडिट, आयसीएआयचा अजब फतवा

Published by : Lokshahi News

तरुणाईच्या दैनंदिन जीवनात सोशल मीडिया हा अविभाज्य भाग बनला आहे. केवळ गमतीजमतीसाठी नव्हे तर, आपली राजकीय – सामाजिक मते मांडण्यासाठी सोशल मीडियाचा वापर ते करतात. आजूबाजूला घडणाऱ्या घटना, सरकारचे निर्णय, राजकीय-सामाजिक घडामोडी यावर अनेकजण सोशल मीडियावर व्यक्त होतात. मात्र, 'द इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडिया'ने (आयसीएआय) यासंदर्भात एक अजब फतवा काढला आहे. त्यामुळे सीएची तयारी करणाऱ्या मुलांवर बंधने आली आहेत.

आयसीएआयच्या म्हणण्यानुसार काही सीए आणि सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सोशल मीडियावरचे लिखाण हे आक्षेपार्ह आहे. अशा सीएंवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची ताकीद संस्थेनं दिली आहे. अनेक सीए आणि विद्यार्थ्यांनी संस्थेबाबतच्या तक्रारी आणि अडचणी संस्थेसमोर मांडण्यापूर्वी समाजमाध्यमांवर मांडल्या होत्या. तर काहींनी थेट मंत्रालयाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे आपल्या व्यवसायाची आणि संस्थेची प्रतिमा मलिन होत असल्याचे संस्थेने म्हटले आहे. अशा स्वरूपाचे लेखन केल्यास सीए आणि विद्यार्थ्यांना कारवाईला सामोरं जावे लागेल. शिवाय विद्यार्थ्यांचीही नोंदणी रद्द करण्यात येईल, असे संस्थेकडून सांगण्यात आले. लिखाणासोबतच काही मजकूर, फोटो, व्हिडीओ फॉरवर्ड न करण्याच्याही सूचना आयसीएआयकडून करण्यात आल्या आहेत. आयसीएआयचा हा अजब फतवा म्हणजे सीए आणि सीए विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असल्याचे बोलले जाते.

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...