कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने मुंबईतील निर्बंध आणखी शिथील करण्यात आले आहेत. मुंबईत रात्रीच संचारबंदी हटवण्यात आली आहे. तसेच सर्व पर्यटन स्थळही खुली होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान नेमके नवे नियम काय आहेत, ते पाहूयात…
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ओमिक्रॉनने मुंबईची चिंता चांगलीच वाढवली होती. कारण एकट्या मुंबईतील रुग्णसंख्या ही पंचवीस हजारांच्या जवळ जाऊन पोहोचली होती. मात्र गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या सतत नियंत्रणात येत आहे. तसेच मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या काही अंशी आटोक्यात येत असल्याने निर्बंध आता पुन्हा शिथिल करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून, हे नियम 28 फेब्रुवारी पर्यंत लागू असणार आहेत.