Business

Reliance JIO कडून मुंबई आणि पुण्यात 5G नेटवर्कच्या टेस्टिंगला सुरुवात

Published by : Lokshahi News

रिलायन्स जिओने देशातील प्रमुख शहरांमध्ये 5G नेटवर्कच्या चाचणीला सुरुवात केली आहे. यासाठी रिलायन्स जिओने जगातील बड्या कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. त्यानुसार सध्या मुंबईत रिलायन्स जिओ स्वत:च्या बळावर 5G चाचण्या करत आहे. तर पुण्यात रिलायन्सकडून नोकिया कंपनीची मदत घेतली जात आहे. तर दिल्ली आणि गुजरातमध्ये जिओकडून एरिक्सन आणि सॅमसंगच्या मदतीने संयुक्तपणे 5G नेटवर्कच्या चाचण्या सुरु आहेत.

हैदराबादमध्येही रिलायन्स 5G चाचणीसाठी तयारी करत आहे. मात्र, त्यासाठी तंत्रज्ञान भागीदार अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. देशात 5G नेटवर्क व्यावसायिक स्वरुपात उपलब्ध करुन देण्यापूर्वी या चाचण्या रिलायन्स जिओसाठी अत्यंत महत्वपूर्ण मानल्या जात आहेत. यासाठी आणखी बराच अवधी लागणार आहे. कारण केंद्र सरकारने अजूनही 5G नेटवर्कसाठी लागणारा परवाना आणि लहरींचा लिलाव केलेला नाही.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड