रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी चलनविषयक त्रैमासिक धोरण जाहीर केले. एमपीसीने पॉलिसी दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर 4 टक्क्यांवर कायम आहे. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, समितीने धोरणात्मक दरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.
रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के राहील. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट आणि बँक रेट 4.25 टक्के असेल. रिझव्र्ह बँकेच्या गव्हर्नरने धोरणात्मक भूमिका 'अनुकूल' ठेवली आहे. केंद्रीय बँकेने सलग 9व्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. यापूर्वी, रिझर्व्ह बँकेने 22 मे 2020 रोजी अखेरचे व्याजदर बदलले होते.