भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील काही सहकारी बँकांवर निर्बंध लादल्याने हजारो खातेदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने आता कोल्हापूरमधील यूथ डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवरील निर्बंध हटवत रिझर्व्ह बँकेने लाखो खातेदारांना दिलासा दिला आहे.
कोल्हापूरमधील या सहकारी बँकेची वाईट आर्थिक स्थिती पाहून रिझर्व्ह बँकेने या बँकेमधून पैसे काढण्यावर पाच हजार रुपयांची मर्यादा घालण्यासह अनेक निर्बंध लादले होते. सुरुवातीला ५ जानेवारी २०१९ रोजी सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले होते. त्यानंतर या निर्बंधांचा कालावधी वेळोवेळी वाढवण्यात आला होता.
दरम्यान, आरबीआयने एक परिपत्रक प्रसिद्ध करत सांगितले की, भारतीय रिझर्व्ह बँकेने या बँकेची आर्थिक स्थिती समाधानकारक असल्याचे पाहिल्यानंतर खातेदारांच्या हिताच्या दृष्टीने ५ एप्रिल २०२१ पासून कोल्हापूरमधील यूथ डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवरील सर्व निर्बंध मागे घेतले आहेत.