टोक्यो ऑल्मिपिकमध्ये भारताच्या खेळाडूंनी आपली आगेकूच कायम ठेवली आहे. आज भारताच्या खात्यामध्ये अजून एक पदक निश्चित झालं आहे. फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये रवी धहीयाने अंतिमफेरीत प्रवेश मिळवला आहे.
टोकियो ऑल्मिपिकचा आज १३ वा दिवस होता. भारतीय कुस्तीपटू रवी कुमारने आज चमकदार कामगिरी केली आहे. रवी कुमारने भारताच्या खात्यात आणखी एक पदक निश्चित केले आहे. त्याने अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.
रवी कुमार दहिया याने फ्रीस्टाइल 57 किलो कुस्तीमध्ये सनसनाटी निकाल मिळवला. 2-9 खाली असूनही, त्याने शेवटच्या क्षणी फॉल (आपल्या खांद्याच्या विरोधकांना मॅटवर पिन करून) जिंकण्यासाठी शेवटच्या क्षणी लढा दिला. तो उद्या सुवर्णपदकाचा सामना खेळणार आहे.