संपूर्ण देशामध्ये कोरोनाचा स्फोट होत असतानाच, काळ रात्री छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका हॉस्पिटलला आग लागली आहे. यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. रायपूरच्या पचेडी नाक्याजवळच्या राजधानी हॉस्पिटलमध्ये ही आग लागली आहे. याच हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे पेशेटंही भरती होते. या आगीमध्ये ५ जणांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
जवळपास 50 रुग्णांवर उपचार सुरु होते. आयसीयूत शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचं सांगितलं जात आहे. रुग्णांना इतर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. 5 मृतांपैकी एकाचा मृत्यू आगीत भाजल्यानं झाला आहे तर इतर 4 जणांचा मृत्यू ऑक्सिजन सप्लाय बंद पडल्यानं झाला आहे. आगीमुळे रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा बंद पडला होता. पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या टीमनं बचाव कार्य केलं.
या संदर्भात राहुल गांधीनी सुद्धा ट्विट केले आहे . या ट्विटमध्ये 'रायपुरमधील हॉस्पिटलला आग ही गोष्ट दुख:द असून या आगीमध्ये मृत झालेलेया व्यक्तीच्या परिवारांच्या दुख:त आम्ही सहभागी आहोत .'असे ट्विट करत या घटने बद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच यावेळी राज्यसरकारने कुटुंबियांना योग्य ती मदत करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.