पंबाजमध्ये राजकीय भूकंपाची मालिकाच सूरू झाली आहे. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिल्यानंतर आता दोनच दिवसांपूर्वी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या महिला मंत्री रजिया सुलताना यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
रझिया सुलताना यांनी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांना पाठवलेल्या राजीनाम्यात काँग्रेस कार्यकर्ती म्हणून काम करत राहणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. "मी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. पंजाबच्या भल्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि इतर लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांप्रमाणेच मी देखील एक कार्यकर्ती म्हणून पक्षाचं काम करत राहीन", असं या राजीनामा पत्रात रजिया सुलताना यांनी म्हटलं आहे.
आज दुपारी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिल्यानंतर आता दोनच दिवसांपूर्वी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या महिला मंत्री रजिया सुलताना यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यापाठोपाठ पंजाबमध्ये दिवसभरातला काँग्रेसला हा दुसरा धक्का आहे.