पंजाबमधील राजकीय नाट्यमय घडामोडींनी वेग पकडला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी राजीनामा सोपवल्याचे वृत्त ताजे असतानाच आता पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सिद्धू यांनी पत्र पाठवलेले आहे. या पत्रात ते म्हणतात, "तडजोडी करण्यापासून माणसाचे चारित्र्य ढासळण्यास सुरूवात होते. मी पंजाबचे भवितव्य व पंजाबच्या कल्याणासाठीच्या योजना यावर तडजोड करणार नाही. त्यामुळे मी पंजाबच्या प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे."सिद्धू यांनी राजीनामा जरी दिलेला असला तरी देखील त्यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे म्हटले आहे.