स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात भारत सरकारचं एक मोठं पाऊल. जम्मू , काश्मीरममध्ये प्रशासकीय परिषदेने शाळा, रस्ते आणि इमारतींमध्ये देशासाठी शहिद झालेल्या जवानांची आणि प्रतिष्ठित व्यक्तींची नावं दिली जाणार आहे. त्यावर जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने गुरुवारी यावर मान्यता दिली आहे. देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचा हा एक भाग असणार आहे.
तसेच बैठकीत उप राज्यपालांचे सल्लागार फारुख खान आणि राजीव राय भटनागर, जम्मू आणि काश्मीरचे मुख्य सचिव अरुणकुमार मेहता आणि उप राज्यपालांचे प्रधान सचिव नितीश्वर कुमार उपस्थित होते. दरम्यान जम्मू आणि काश्मीर सरकारने सांगितले, "केंद्रशासित प्रदेशाच्या सुरक्षा आणि विकासासाठी ज्यांनी बहुमोल योगदान दिलं आहे, त्यांचा आदर आणि सन्मान म्हणून, अनेक पायाभूत सुविधांना राष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या लोकांची नावं देण्यात येतील." ज्यातून प्रगतीशील भारताची 75 वर्ष आणि या काळात लोकांनी मिळवलेलं यशाचा गौरव आहे. आणि हा महोत्सव भारतातील लोकांना समर्पित आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवचा अधिकृत प्रवास 12 मार्च 2021 पासून सुरू झाला होता आणि तो 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरु असणार आहे.