ठाण्याच्या वर्तकनगर परिसरात पब्जी (Pubg) खेळात वारंवार जिंकण्यावरून 20 वर्षीय साहिल बबन जाधव (Sahil Baban Jadhav) या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून मुख्य आरोपीसह अन्य दोन अल्पवयीन तरुणांनी चाकू, सुरे, तलवारीने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात साहिलचा मृत्यू झाला. वर्तकनगर पोलीस ठाण्यात (Police Thane)याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असुन तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पबजी खेळाचा वाद काही केल्या सपंण्याचे नाव घेत नाहीये. सतत जिंकत असल्यावरून २०१९ मध्ये साहिल आणि अटक तिन्ही आरोपींचा वाद आणि किरकोळ हाणामारी झाली होती. या वादाची अदखलपात्र तक्रारही वर्तकनगर पोलीस ठाण्यात साहिलने दिलेली होती. याचाच राग मनात धरून १ मार्चच्या रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी प्रणव प्रभाकर माळी , राहुल महादेव गायकवाड (Rahul Gaikwad) आणि गौरव रवींद्र मिसाळ (Gaurav misal) यांनी एकत्र येऊन साहिल जाधव यांच्यावर चाकू, सूरा आणि तवारीच्या सहाय्याने जानकीदेवी चाळ, जुनी पाईपलाईन जवळ गाठून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. साहिलच्या छातीत, पाठीत, डोक्यावर, गुडघ्यावर वार करून भोकसले ज्यात साहिलचा मृत्यू झाला. वर्तकनगर पोलिसांनी या हत्येप्रकरणी एका मुख्य आरोपी प्रणव सह दोन अल्पवयीन आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला असुन तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता ठाणे न्यायालयाने ६ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे. यात प्रणव याला वर्तकनगर पोलीस ठाण्यात तर अल्पवयीन आरोपी राहुल आणि गौरव यांची भिवंडीच्या Bhivandi बालसुधार गृहात रवानगी केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.व्ही. निकम (S.V.Nikam)यांनी दिली आहे.