देशातील कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवडले गेले आहेत. अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म 'द मॉर्निंग कन्सल्ट'च्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता रेटिंगमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (American President Joe Biden) आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Britain President Boris Johnson) यांच्यासह जगातील 13 राष्ट्रप्रमुखांना मागे टाकले आहे.
पंतप्रधान मोदींची मान्यता गुणांकन म्हणजेच अॅप्रूव्हल रेटिंग हे जगातील इतर कोणत्याही नेत्यापेक्षा सर्वाधिक आहे. ७१ टक्क्यांसाहीत मोदींनी या यादीमध्ये पहिलं स्थान मिळवलंय. अमेरिकतील ग्लोबल लीडर अॅप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने हे सर्वेक्षण केलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेते ठरले आहे. त्यांनी जगभरातील १३ नेत्यांना मागे टाकत ही लोकप्रियता मिळवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचं सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, इटालियन पंतप्रधान मारियो ड्रॅगी यासारख्या नेत्यांचाही या यादीमध्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी समावेश आहे.
या सर्वेक्षणामध्ये जगभरातील १३ मोठ्या नेत्यांचा कामगिरीचा आढावा घेण्यात आला. यात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे सहाव्या स्थानी आहेत. त्यांना ४३ टक्के लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे. बायडेन यांच्या खालोखाल कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदो यांचा क्रमांक या यादीमध्ये लागलाय. त्रुदो यांनाही ४३ टक्के लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्या खालोखाल ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा क्रमांक असून ४१ टक्के लोकांनी मॉरिसन यांच्या बाजूने मतदान केलंय.
पंतप्रधान मोदी जगात सर्वाधिक लोकप्रिय नेते
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी – 71 टक्के
मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर – 66 टक्के
इटलीच्या पंतप्रधान मारिया द्राघी – 60 टक्के
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा – 48 टक्के
जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ – 44 टक्के
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन – 43 टक्के
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो – 43 टक्के
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन – 41 टक्के
स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ – 40 टक्के
कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-ए – 40 टक्के