अर्थसंकल्पीय संसद अधिवेशन सुरू असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovindam) यांच्या भाषणावर सत्ताधारी आणि विरोधकांमधील विविध खासदारांची भाषणे पूर्ण झाली आहेत. आता लोकसभेत या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) उत्तर देत आहेत. यावेळी ते विरोधी पक्षांनी जे विविध मुद्दे उपस्थित केले त्याबाबत आणि सरकारच्या धोरणांबाबत भूमिका स्पष्ट करत आहेत.
यावेळी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी भाषणादरम्यान "नागालँडमधील लोकांनी १९९८ ला काँग्रेसला मत दिले होते, ओरिसात १९९५ ला शेवटचे बहुमत दिले होते. त्रिपुरात १९८८ मध्ये काँग्रेसला बहुमत दिले होते. पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्षे बहुमत मिळाले नाही, आंध्र प्रदेशमध्ये १९६२ नंतर सत्ता मिळाली नाही. काँग्रेस तेलंगणा राज्य निर्मितीचं श्रेय घेते, पण त्यानंतर तेथील लोकांनी त्यांना स्वीकारलं नाही. झारखंडची निर्मिती होऊन २० वर्षे झाली अजून बहुमत मिळाले नाही," असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला.
"वो जब दिन को रात कहें, तो तुरंत मान जाओ। नहीं मानोगे तो वो दिन में नकाब ओढ़ लेंगे। जरूरत हुई तो हकीकत को थोड़ा बहुत मरोड़ लेंगे, वो मगरूर हैं खुद की समझ पर बेइंतहा, इन्हें आईना मत दिखाओ, वो आईने को भी तोड़ देंगे।" अशा भाषेत पंतप्रधान मोदींकडून शेरोशायरीच्या रुपात काँग्रेसवर हल्लाबोल करण्यात आला.