Mahinda Rajpaksa Team Lokshahi
International

श्रीलंकेचे पंतप्रधान राजीनामा दिला? पंतप्रधान कार्यालयानं केलं स्पष्ट

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी देशात आणीबाणी लागू केली आहे.

Published by : Sudhir Kakde

श्रीलंकेचे (Sri Lanka) पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Mahinda Rajpaksa) यांनी राजीनामा दिल्याच्या काही अफवा समोर आल्या होत्या. श्रीलंकेमध्ये सध्या निर्माण झालेली परिस्थिती ही अत्यंत चिंताजनक असून, सरकारने आणीबाणीची (Emergency in Sri Lanka) घोषणा केली आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच पंतप्रधान महिंदा राजपक्षे हे राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आता श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यलयाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी देशात आणीबाणी लागू केली आणि सांगितलं की, देशात जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे लोकांनी देशाच्या सध्याच्या परिस्थितीसाठी सत्तेत असलेल्या सरकारला जबाबदार धरलं आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच पंतप्रधान महिंदा राजपक्षे हे राजीनामा देत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. तुर्तास राजीनामा देण्याचा कुठलाही विचार नाही असं पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका