दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी मॉड्यूलचा (Pakistan-organised module) भांडाफोड करत मंगळवारी सहा जणांना अटक केली. या पार्श्वभूमीवर एटीएस प्रमुखांची पत्रकार परिषद चालू आहे. यामध्ये एटीएस अधिकाऱ्यांनी पकडल्या गेलेल्या अतिरेकी बद्दल माहिती दिली. यामध्ये जान शेखचं २० वर्ष जून दाऊत कनेक्शन आहे. या संदर्भात दिल्ली पोलिसांकडे सर्व माहिती आहे. जान शेखचे धरावीमध्ये वास्तव्य होते.जान कडून माहिती गोळा करून एटीएस एक
पथक दिल्लीला रवाना होणार. जान शेख कडून स्फोटकांची माहिती मिळाली नाही.
बंगाली भाषेत बोलणारे आणि पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन परत आलेले 16 जण पश्चिम बंगालमध्ये लपले असू शकतात, असा दावा दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पकडलेल्या संशयित दहशतवाद्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आम्हाला पैशांचा लोभ नाही, फक्त जिहादसाठी आम्ही पाकिस्तानला प्रशिक्षण घेण्यासाठी गेलो होतो, असं दहशतवाद्यांनी सांगितल्याची माहिती आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी मॉड्यूलचा (Pakistan-organised module) भांडाफोड करत मंगळवारी सहा जणांना अटक केली. देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असल्याचं समोर आलं आहे.
या दहशतवाद्यांपैकी 47 वर्षीय समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख (Jan Mohammad Shaikh) याने गणपती विसर्जनासाठी महत्त्वाचे ठिकाण असलेल्या दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी, मरिन ड्राईव्ह परिसराची रेकी केली होती. तसेच अनेक वेळा त्याने मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांची तपासणीही केली होती, अशी माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) सूत्रांनी दिली.
अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांनी सांगितले, की गर्दी असलेल्या प्रत्येक भागात हल्ला करण्याचे त्यांचे लक्ष्य होते. त्यांनी या संदर्भात अनेक ठिकाणी रेकी केली होती, तर अनेक ठिकाणी त्यांना रेकी करणं बाकी होतं. यामध्ये मुंबईतील वर्दळीची ठिकाणं, लोकल ट्रेन, मोठी मंदिरे, तसेच उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमधील मोठ्या मैदानाचा समावेश असल्याचं बोललं जातं. गणेशोत्सव, नवरात्री, दसरा, रामलीला आणि निवडणूक सभा होणाऱ्या मोठ्या मैदानांचा यात समावेश आहे.
शेखच्या कुटुंबीयांचीही चौकशी
जान मोहम्मदला पत्नी आणि दोन मुली आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांचीही धारावी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन चौकशी केली. "जान मोहम्मदने काही दिवस ड्रायव्हर म्हणून काम केले, त्यानंतर त्याने कुरिअर बॉय म्हणून काम करण्यास सुरुवात केली. जान सोमवारी संध्याकाळपर्यंत मुंबईत होता. अचानक घरी आला आणि त्याने आपल्याला सांगितलं, की तो काही मित्रांसह उत्तर प्रदेशला जात आहे" अशी माहिती त्याच्या पत्नीने पोलिसांना दिली. पत्नीला याबाबत संशय आल्यावर त्याने मोबाईलमध्ये तिकीट दाखवले. मात्र पत्नी आणखी काही विचारण्याआधी त्याने घाईघाईने कपडे बॅगेमध्ये भरले आणि संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला, अशी माहिती जान मोहम्मदच्या पत्नीने दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.