उद्या भारताचा ७५ वा स्वातंत्रदिन साजरा आहे.या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना तसेच देशाच्या बाहेर राहणाऱ्या भारतीयांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.हा दिवस आपल्यासाठी आनंदाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
"स्वातंत्र्यदिन हा आपल्या मुक्ततेचा सोहळा आहे. आपले स्वातंत्र्याचे स्वप्न ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या अनेक पिढ्यांच्या संघर्षातून साकार झालं आहे. त्यांनी मोठा त्याग केला आहे. त्या शूर हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीला मी नमन करतो. परंपरांची बहुलता आणि तरीही सर्वात मोठी आणि जीवंत लोकशाही पाहून जग भारताकडे विस्मयाने पाहत आहे".अशा शब्दात त्यांनी भारतीयांना ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.