Uttar Maharashtra

फडणवीसांना व्हिडिओ फुटेज कसे मिळाले? प्रविण चव्हाण यांनी केला खुलाशा

Published by : Jitendra Zavar

मंगेश जोशी| जळगाव

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांच्या कार्यालयातील १२५ तासांचे व्हिडिओ फुटेज सादर केले होते. या व्हिडिओजच्या आधारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर अनेक गंभीर आरोप केले होते. हे व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांना मिळाले कसे? याचा खुलाशा विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केला.

विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण(Pravin Pandit Chavan) यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांना मोकामध्ये अडकवण्याचा कट रचल्याचा आरोपानंतर चव्हाण प्रथमच माध्यमांसमोर आले. चव्हाण यांनी हे संपूर्ण प्रकरण कसे घडले असावे याचा देखील त्यांनी उलगडा केला. ते म्हणाले, जळगावमधील तेजस मोरे हा आपला अशिल आहे. त्याने आपणास एक घड्याळ भेट दिले होते. ते घड्याळ कार्यालयाच्या भिंतीवरील लावले होते. या घड्याळात कॅमेरा बसवून हे स्टिंग ऑपरेशन केले असण्याची शक्यता आहे.
रेकॉर्डिंग मॅन्यूपुलेट
सर्व रेकॉर्डिंग मॅन्यूपुलेट आहेत. यातील आवाज आपला नाही. तेजस मोरे याला आपण जामीन मिळवून दिला होता. त्याचे पैसेही त्याच्याकडे बाकी आहेत. तो जळगाव येथील रहिवासी आहे. त्याने एक दिवस भिंतीवरचे घड्याळ भेट दिले. ते त्याने आपल्या कार्यालयात समोरच्या भिंतीवर बसविले. त्यात कॅमेरा बसवून चित्रीकरण केले असण्याची शक्यता आहे. तो जळगाव येथील असल्याने त्याला मॅनेज केले असावे असे आपणास वाटते. याबाबत आपण संपूर्ण कायद्याचा अभ्यास करून स्वतः गुन्हा दाखल करणार आहोत.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती