Mumbai

फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब : अनिल गोटे, प्रविण चव्हाण यांनी फेटाळले आरोप, म्हणाले…

Published by : Jitendra Zavar

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी आज विधानसभेत (vidhansabha) राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकिलावर गंभीर आरोप करत पेन ड्राईव्ह बॉम्ब सादर केला. सरकारी पक्षांकडून पोलिसांचा वापर वाढला. सरकार जर षड्यंत्र करत असेल तर लोकशाही संपेल, असे वक्तव्य करत फडणवीस यांनी पेन ड्राईव्ह अध्यक्षांकडे सुपुर्द करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी फडणवीस यांनी माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) आणि विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण (pravin chavan)यांचे नाव घेतले. दरम्यान या दोघांनी आरोप फेटाळले असून अनिल गोटे यांनी तो व्हिडिओ खोटा असल्याचा दावा केला.

माध्यमांशी बोलतांना गोटे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिस यंत्रणा घरगड्याप्रमाणे वापरली. डॉ हेमंत देशमुख (Dr. Hemant Deshmukh) वय ८२ वर्ष यांना ९वर्षाच्या मुलीवर बलात्कारच्या आरोपाखाली अटक करायला पोलीसांवर दबाव आणला का ? या प्रकरणात उच्च न्यायालयाने ताशेरे ओढून फी रद्द केली.

प्रवीण चव्हाण म्हणाले…
दरम्यान, विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांत तथ्थ्य नाही आहे. मी फक्त ऑफिसमध्ये बसलेला दिसत आहे. ऑफिसमधील कुठल्यातरी व्यक्तीला मॅनेज करून व्हिडीओ शुटिंग घेतलं असावं. हे व्हिडीओ मॅनिप्युलेट केलेले आहेत. अनिल गोटे माझ्या कार्यालयात आले होते. ते पुण्यातील एका केस संदर्भात माझ्याकडे आले होते. त्यावेळी गोटे यांनी काही कागदपत्रे दाखवली. मात्र माझ्याकडे वेळ नसल्याचे मी त्यांना सांगितले. तसेच अनिल देशमुखांसंदर्भात मी कुठलेही विधान केलेले नाही.

फडणवीसांचा आरोप होता की…
फडणवीस यांनी सभागृहात घणाघाती भाषण करत म्हणाले की, जामनेरचे भाजप आमदार गिरीश महाजन (girish mahajan) यांच्यावर मोक्का लावण्यासाठी विशेष सरकारी वकिलांनी षडयंत्रं रचलं होतं. त्याला आमच्या पक्षातून सत्ताधारी पक्षात आलेल्या एका नेत्याने मदत केली. 2021मध्ये गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल केला. 2018मध्ये मराठा शिक्षण मंडळाच्या एका गटात संघर्ष आहे. पाटील गट आणि भोईटे गटात हा संघर्ष आहे. महाजनांचे स्वीय सहाय्यकाने अपहरण केल्याच बनावट केस केली. त्या केसमध्ये महाजनांना मोक्का लागला पाहिजे असं सांगून मोका लावण्याचे कागदपत्रं तयार झाले. कोर्टाने महाजनांना दिलासा दिला. राज्य सरकार काय षडयंत्र करते ते सांगतो. एका कत्तलखान्याची कथा. विरोधकांची कत्तल कशी करायची हे षडयंत्र शिजतंय. विशेष सरकारी वकील प्रवीण पंडीत चव्हाण हे या षडयंत्राचे कर्ते आहेत. आमच्याही काळात आणि तुमच्याही काळात त्यांना केस दिल्या. महेश मोतेवार, रमेश कदम, सुरेश जैन, डिएचएल बँक आदी केसेस त्यांना दिल्या होत्या, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ही सर्व कथा हे सरकारी वकील आपल्या तोंडाने सांगतील. प्रत्येक घटनेचा छोटा व्हिडीओही तयार केला. महाविकास आघाडीच्या कारागृहात गेलेल्या नेत्यांबाबतही त्यांनी खुलासा केला आहे. माझ्याकडे सव्वाशे तासाचं रेकॉर्डिंग आहे. आता मी निवडक भाग देतो. यातील काही भाग सभागृहाची इभ्रत घालवणारं आहे ते सांगू शकत नाही, असं त्यांनी सांगितलं.

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती