प्रभास आणि पूजा हेगडे यांचा चित्रपट 'राधे श्याम' (Radhe Shyam) आणि अनुपम खेर (Anupam Kher) – मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांचा 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) 11 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. दोन्ही पाहिले तर दोन्ही चित्रपटात खुप फरक आहे. एक मेगा बजेट पॅन इंडिया चित्रपट होता, तर दुसरा लहान बजेट चित्रपट होता, ज्याचे प्रमोशन (Promotion) देखील मर्यादित होते.पण बॉक्स ऑफिसवर (box office) 'द काश्मीर फाइल्स'ने पहिल्या दिवशी 'राधे श्याम'ला जबरदस्त स्पर्धा दिली आहे. साऊथमध्ये (south) 'राधे श्याम' या चित्रपटाची ओपनिंग चांगली झाली होती. मात्र हिंदी भाषेतील चित्रपटाची क्रेझ खुपच कमी होताना दिसत आहे. राधे श्यामची हिंदीत खूपच हळु सुरुवात झाली आहे. या चित्रपटाने 3-3.5 कोटींचा गल्ला जमवला आहे.
तर दुसरी कडे विवेक अग्निहोत्रीने (Vivek Agnihotri) निर्देशित केलेली द काश्मीर फाइल्सने चित्रपटाची ओपनिंग चांगली केली आहे. या चित्रपटाने जवळपास 4 कोटींची ओपनिंग केली आहे आणि या चित्रपटने भारतात केवळ 561 स्क्रीन्सवर पदार्पण केले आहे.
एका खर्या शोकांतिकेवर आधारित, आणि रुद्याला स्पर्श करणारा हा चित्रपट काश्मीर खोर्यातील 1990 मध्ये काश्मिरी (Kashmiri) पंडितांच्या दुर्दशेची कहानी आहे, ज्यांना इस्लामिक दहशतवाद्यांनी घर सोडून पळून जाण्यास भाग पाडले होते. या चित्रपटाशी प्रेक्षक भावनिकदृष्ट्या खूप जोडले गेले आहेत. तसेच राधे श्याम एक 350 कोटीं बजेटचा चित्रपट आहे. हिंदी पट्ट्यात या चित्रपटाने मस्त सुरुवात केली आहे. पण साउथ मध्ये चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.