क्रूझ ड्रग्ज केस (Cruise Drugs Case) प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा (Prabhakar Sail) मृत्यू झाल्याची माहिती आज सकाळी समोर आली. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आपल्याकडून कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्याचा आरोप समीर वानखेडेंनी केला होता. तसंच त्यांनंतर ते प्रभाकर साईलने (Prabhakar Sail) आपल्या जीवाला धोका असल्याचं देखील म्हटलं होतं. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालक यांना चौकशीचे आदेश दिले आहे. प्रभाकर साईलचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगण्यात येतंय. मात्र राष्ट्रवादीने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमके काय खुलासे होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे राज्यातील संपूर्ण वातावरण ढवळून निघालं होतं. राज्याचे तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी याबद्दल एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले होते.
प्रभाकर साईल हा के.पी. गोसावीचा अंगरक्षक म्हणून काम करत होता. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात के.पी. गोसावीचा देखील मोठा हात असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय खुलासे होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.