Ganesh Utsav 2021

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट ; रंगारी कट्टा दिलखूलास राजकीय गप्पांनी रंगला

Published by : Lokshahi News

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव उत्साहात सूरू आहे. या उत्सवाला गणेशभक्तांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आज या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवात रंगारी कट्टा दिलखूलास गप्पांनी रंगला होता.राजकीय नेत्यांशी या कट्ट्यावर मनसोक्त गप्पा झाल्या.

रंगारी कट्ट्यावर आज पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, कॉंग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे, मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे व आर.पी.आय आठवले गटाचे मंदार जोशी येणार आहेत. या राजकीय नेत्यांशी दिलखूलास गप्पांची मैफील रंगली होती. यावेळी राजकीय नेत्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आहेत. यंदा या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे. हा महोत्सव 10 ते 19 सप्टेंबर दरम्यान असाच सूरू राहणार आहे. ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव दरदिवशी लोकशाही न्यूजवर Lokshahi News आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या www.bhaurangari.com संकेतस्थळावर रात्री ८ वाजता पाहता येणार आहे. त्यामुळे या ऑनलाइन महोत्सवाचा गणेशभक्तांनी मनसोक्त आनंद घ्यावा, असे आवाहन लोकशाही न्यूज यानिमित्त करत आहे.

Latest Marathi News Updates live: संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू

मुंबईत 36 पैकी 16 जागा जिंकत भाजपची जोरदार मुसंडी

मध्य रेल्वे मार्गावर तीन दिवस विशेष वाहतूक ब्लॉक

हेल्दी आणि टेस्टी मुगाच्या लाडूची रेसिपी; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू; विविध विधेयकांवर होणार निर्णय