विकास माने | बीड | मुख्याध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षिकेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटना बीड जिल्ह्यातील राजेवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेतून उघडकीस आली आहे.
मागील काही दिवसांपासून मुख्याध्यापक आणि शिक्षिका यांच्यामध्ये अंतर्गत वाद सुरू होता. यातूनच शिक्षिकेने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर माजलगावमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी मुख्याध्यापकांनी आरोप फेटाळले आहेत. दोघांच्या वादांमुळे काही दिवसांपासून शाळा बंद देखील ठेवण्यात आली होती. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.