उद्या पहाटे योगदिनानिमित्त जनतेशी संबोधणार आहे. योगा दिवस साजरा करणार आहोत.या वर्षीचा विषय म्हणजे 'योग फॉर वेलनेस' असणार आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हा विषय महत्त्वाचा आहे. या योग अभ्यासावर भर दिला जाईल. असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. मोदी यांचं भाषण दूरदर्शनसह इतर टीव्ही चॅनेल्सवर लाइव्ह दाखवण्यात येणार आहे.
सोबतच आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजूही देशाला संबोधणार असून या कार्यक्रमात बरेच लोक सहभागी होणार आहे.
यामध्ये फक्त २० जणांना उपस्थितीची परवानगी दिली आहे. माहितीनुसार, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लाल किल्ला परिसरात योगा करण्यात येणार आहे. दरम्यान, यावेळी कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम होणार नसून संवाद साधल्यानंतर हा योगा करण्यात येणार आहे.