पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करत आहेत. कोरोना संकटात शेती आणि सूक्ष्म, लघु उद्योगांनी अर्थव्यवस्थेला हात दिला. अनेक विकासकामं, प्रकल्पं मार्गी लागले. कोरोना संकट काळात भारतानं केलेल्या प्रयत्नांचं जगभरात कौतुक होत आहे.
लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी महत्त्वाची घोषणा केली. यापुढे २०० कोटीपर्यंतच्या कामांसाठी ग्लोबल टेंडर काढण्यात येणार नाही. अशी कामं भारतातील कंपन्यांनी दिली जातील. त्यामुळे रोजगार वाढतील. लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळेल, असे मोदी म्हणाले.
याशिवाय लॉकडाऊन काळात कोणी उपाशी राहू नये यासाठी ८० कोटी लोकांना मोफत रेशन दिलं. लाखो लोकांना घरं दिली. ५ कोटी ग्रामीण कुटुंबाना नळातून पाणी पुरवलं.
मोबाईल उत्पादनात भारत आता जगात पहिल्या क्रमांकावर आहे. ऑटोमोबाईल, बॅटरी निर्मितीत आपला समावेश अग्रगण्य देशांच्या यादीत होतो. इंजिनीयरिंग उत्पादनांची निर्यात वाढली आहे. हे यश देशातील १३० कोटी नागरिकांचं असल्याचं मोदी म्हणाले.
आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी केलेलं काम तर अतिशय कौतुकास्पद आहे. मी त्यांचे आभार मानतो, असे मोदी म्हणाले.