Uncategorized

समुद्रात आढळला गुलाबी डॉल्फिन, पाहा व्हिडीओ

Published by : Lokshahi News

अथांग समुद्रामध्ये अनेक सहस्य दडली आहेत. अनेकविध वनस्पती, प्रवाळ, विविध रंगांचे-आकाराचे मासे आणि अन्य समुद्री जीव यांमुळे समुद्राच्या आतलं जग समृद्ध झालेलं असतं. समुद्रात आढळणारे व्हेल, डॉल्फिन यांसारखे मासे हा देखील अनेकांसाठी कुतुहलाचा विषय असतो. या कुतुहलाला आणखी वाढवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यात चक्क एक गुलाबी रंगाचा डॉल्फिन पोहोताना दिसत आहे.

सोलो पॅरा क्युरियोस नावाच्या एका ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तो पाहून सर्वांना अचंबा वाटत आहे. हा आनुवंशिक बदल आहे की एखादं शेवाळ ज्यामुळे त्याचा रंग गुलाबी दिसत आहे, अशा प्रकारचा प्रश्नही अनेक युजर्सना पडला आहे.

त्यावर एका युजरने अॅमेझॉनच्या पात्रात गुलाबी डॉल्फिन आढळतात असं म्हटलं आहे. जागतिक निसर्ग संधारण संघटनेने या प्रजातीला अतिसंवेदनशील गटात समाविष्ट केलं आहे. या संस्थेच्या म्हणण्यानुसार, गुलाबी डॉल्फिनसाठी बदलतं पर्यावरण हा अस्तित्वाचा संघर्ष ठरत आहे. प्रदुषण, जहाजांना आपटून होणारे अपघात, मासेमारी यांमुळे त्यांचं अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड