Headline

पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले

Published by : Lokshahi News

सरकारी तेल कंपन्यांनी एक दिवसानंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले ​​आहेत. आज देशातील जवळजवळ सर्व शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात सुमारे 25 पैशांनी वाढ करण्यात आली आहे तर डिझेलच्या किंमतीत 30 पैसे प्रति लीटरने वाढ करण्यात आली आहे. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा दर 107.71 रुपये तर डिझेलचा दर 97.52 रुपयांपर्यंत गेला आहे. दिल्लीत एक लीटर पेट्रोलचा दर 101.64 रुपयापर्यंत पोहोचला आहे तर डिझेलचा दर 89.91 रुपयांवर गेला आहे.

तज्ज्ञांच्या मतानुसार, आतंरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलचे दर कमी होणे हा चांगला संकेत आहे. मात्र, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या दरात झालेल्या घसरणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांचा ग्राहकांना फायदा मिळत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त होऊन देखील भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या दरात झालेल्या घसरणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांचा ग्राहकांना फायदा मिळत नाही.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो. दसऱ्यापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नवे उच्चांक प्रस्थापित करतील, अशी माहिती आहे. प्रत्यक्षात असे घडल्यास सामान्य नागरिकांना त्याची प्रचंड झळ सोसावी लागणार आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result