पाकिस्तानच्या लष्करातील (Pakistan army)दोन हिंदू अधिकार्यांची लेफ्टनंट कर्नल पदावर (Lieutenant Colonel)बढती करण्यात आली आहे. यामुळे या विषयाची चर्चा पाकिस्तानी माध्यमांत मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. यासंदर्भातील वृत्त पाकिस्तानच्या अधिकृत मीडियाने दिले आहे.
पाकिस्ताम मुस्लिम राष्ट्र आहे. त्या देशांतील हिंदू समुदायास उच्च पदावर नियुक्तीच्या घटना क्वचितच घडतात. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात हिंदू न्यायमुर्तींची नियुक्ती झाल्याची घटना काही महिन्यांपुर्वीच घडली होती. त्यानंतर आता लष्करात लेफ्टनंट कर्नल पदावर हिंदू अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली.
पाकिस्तानच्या या निर्णयाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. मेजर डॉ. केलाश कुमार आणि मेजर डॉ. अनिल कुमार अशी या हिंदू अधिकाऱ्यांची ( Hindu community)नावे आहेत. पाकिस्तान आर्मी प्रमोशन बोर्डाने त्यांच्या पदोन्नतीला मान्यता दिली आहे. मेजर डॉ. कैलाश कुमार आणि मेजर डॉ. अनिल कुमार यांना लेफ्टनंट कर्नल पदावर बढती दिल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे.
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यातील रहिवासी असलेले कैलाश कुमार हे २०१९ मध्ये हिंदू समुदायातील देशातील पहिले मेजर बनले होते. त्यांचा जन्म १९८१ मध्ये झाला होता. जामशोरो येथील लियाकत युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ अँड सायन्सेसमधून एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर २००८ मध्ये ते पाकिस्तानी लष्करात कॅप्टन म्हणून सामील झाले होते.