कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना पहिली गणेशाची पूजा करुन त्या कार्याला सुरुवात केली जाते. यावर्षी ३१ ऑगस्टला आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. मात्र या पूजेत घरी प्राणप्रतिष्ठापना करताना डाव्या सोंडेच्या गणेशालाच प्राधान्य दिलं जाते.
जव्या सोंडेच्या गणपतीची पूजा-उपासना करणे कठीण असते हा निव्वळ एक गैरसमज आहे. ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्या मते, कोणताही देव आपल्या भक्तांना शिक्षा देत नाही. देवाची उपासना करताना मनातील निर्मळ श्रद्धा महत्त्वाची असते.
डाव्या बाजूला सोंड असणाऱ्या असलेल्या गणपतीला वामुखी गणपती आणि उजव्या बाजूला सोंडे असलेल्या गणपतीला सिद्धिविनायक म्हणतात. सिद्धिविनायकाला सोवळ्याचा आणि कडक गणपती मानले जाते. त्याची पूजा करताना चूक झाल्यास तो शिक्षा देतो असेही म्हणतात. म्हणूनच वामुखी गणपतीची पूजा करणे हे सिद्धिविनायकापेक्षा सोपे आहे. असे म्हणतात, सिद्धिविनायकाची पूजा करताना काही विशेष नियमांचे पालन करावे लागते, जे केवळ मंदिरात किंवा कोणत्याही धार्मिक स्थळावर शक्य आहे. यामुळेच डाव्या बाजूला सोंड असलेला गणपती घरी आणण्याचा सल्ला दिला जातो.
गणपतीची मूर्ती विकत घेताना सर्वप्रथम, ती मूर्ती पीओपी नसावी याची काळजी घ्या. इको फ्रेंडली मुर्त्यांचे विसर्जन करणे अधिक सोपे असते आणि ते पर्यावरणासाठीही सुरक्षित असते.