लाडक्या गणरायाचे आज घरोघरी आगमन झाले. घरोघरी आणि सार्वजानिक गणेश मंडळात, घरोघरी एकदंत, विघ्नहर्ता गणरायाचे आज आगमन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया!’…एक..दोन..तीन..चार…गणपतीचा जय जयकार!…असा जयघोष…ढोल-ताशांचा घुमणारा आवाज…गुलाल, फुलांची उधळण…अशा उत्साहात आज घरोघरी बाप्पाचे आगमन झाले.
बाप्पाचा आवडता खाऊ म्हणजे मोदक. मोदक हा बाप्पाचा सर्वात प्रिय. गणपतीला मोदक इतका आवडतो तरी का? चला तर जाणून घेऊया, गणपतीला एकदंत असंही म्हणतात. असं सांगितलं जातं की, बाप्पांचा एक दात तुटला तेव्हापासून त्यांना हे नाव पडलं. एक दात नसल्यामुळं त्यांच्यासाठी मऊसूत मोदक तयार करण्यात आले, तेव्हापासूनच गणरायाचं हे आवडतं खाद्य ठरलं.