सध्याच्या इंटरनेटच्या INTERNATE जमान्यामध्ये विविध ठिकाणी प्रवास करत असताना आता रस्त्यामध्ये पत्ता विचारायची काही जरुरत नाही. कारण आपण सर्व गुगल मॅप Google Map चा वापर करत असतो. गुगल मॅप्सचा वापर करून आपण आपल्याला हव्या त्या ठिकाणी योग्य मार्गाने जाऊ शकतो. याच गुगल मॅप मध्ये सध्या नवीन बदल झाला आहे. तो काय आहे? तो बदल ठाऊक आहे का? नसेल तर आपण जाणून घेऊया.
Google Map : आपल्यापैकी अनेकजण माहित नसलेली ठिकाणे शोधण्यासाठी गुगल मॅपचा (Google Map) वापरत करत असतो. गुगलकडूननही वेळोवेळी वापरकर्त्यांना याचा वापर करणे आणि नवनवीन सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जातात. असेच एक नवे अपडेट (Google Map Update) गुगलकडून गुगल मॅपसाठी देण्यात आले आहे. त्यानुसार गुगल मॅपच्या मदतीने तुम्हाला तुमच्या वाटेत असणाऱ्या टोलवरील (Toll Naka) संभव्य शुक्लाची माहिती देणार आहे. नवीन अपडेटनंतर, गुगल मॅप्सच्या वापरकर्त्यांना पेमेंट मोडसह टोल आणि त्याची किंमत याबद्दल माहिती उपलब्ध होणार आहे. गुगलचे हे नवीन उपडेट सुमारे 2,000 टोल रस्त्यांसाठी उपलब्ध आहे. (Google Map Update)
गुगल मॅपने (Google Maps) जारी केलेल्या नवीन अपडेटमध्ये वापरकर्त्यांना त्यांच्या वाटेत असणाऱ्या टोलवरील शुल्काविषयी अंदाजे माहिती देण्यात येणार आहे. गुगलचे हे नवीन अपडेट सध्या iOS साठी उपलब्ध करून देण्यात आले असून हे अपडेट Apple Siri ला देखील सपोर्ट करणार आहे. म्हणजेच Apple Siri च्या मदतीने तुम्ही नेव्हिगेशन देखील वापरणे सहज शक्य होणार आहे.