केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा (UPSC) मुख्य परीक्षा 2022 ची तारीख जाहीर ठरली आहे. यूपीएससीची मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार असून UPSC ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर या संदर्भात नोटीस जारी केली आहे. त्यांनी माहिती दिली आहे की, परीक्षेचे 2022 चे संपूर्ण वेळापत्रक वेबसाईटवर (Website) प्रसिद्ध करण्यात आले आहे. या बातमीत पुढील दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण UPSC मुख्य 2022 वेळापत्रक डाउनलोड करू शकता.
ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता त्यांना मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी केले जाईल. – उमेदवार त्यांचे प्रवेशपत्र upedsced.goved.in वरून डाऊनलोड करू शकतील. UPSC ने निर्धारित वेळापत्रकानुसार नागरी सेवा मुख्य परीक्षा 2022 ही 16, 17, 18, 24 आणि 25 सप्टेंबर 2022 रोजी घेतली जाईल. परीक्षा दररोज दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली शिफ्ट सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत असेल. दुसऱ्या शिफ्टची परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत होईल.
ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता त्यांना UPSC मुख्य 2022 प्रवेशपत्र ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी केले जाईल. तुम्ही तुमचे UPSC प्रवेशपत्र upsc.gov.in वरून डाउनलोड करू शकाल.