हिमालयातील एक लोकप्रिय स्थळ म्हणजेच मनाली. एक असे ठिकाण जे भर उन्हाळ्यातही सर्वांना आराम देते. मनाली (Manali) हे शहर 'मनू' नावाने देखील ओळखले जाते. एका पौराणिक कथेनुसार प्रलयाने जगाचा नाश झाल्यानंतर मनू नावाचे ऋषी मानवी जीवनाची पुनर्निर्मीती करण्यासाठी येथे उतरले होते म्हणूनच मनालीला 'मनू' म्हणूनही ओळखले जाते. मनाली आणि आजूबाजूचा परिसर भारतीय संस्कृती (Indian Culture) आणि वारशासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण ते सप्तऋषी किंवा सात ऋषींचे निवासस्थान असल्याचे म्हटले जाते. अनेक पर्यटक हे नेहमी मनालीला भेट देत असतात.
मनाली मध्ये अनेक पर्यटक स्कीइंग, हायकिंग, पर्वतारोहण, पॅराग्लायडिंग (paragliding), राफ्टिंग (Rafting), ट्रेकिंग, कयाकिंग आणि माउंटन बाइकिंग(mountain biking) यांसारख्या साहसी खेळांचा देखील आनंद घेतात. "याक स्कीइंग" हा या प्रदेशातील एक अनोखा खेळ आहे. या खेळात दोरीचे एक टोक याक आणि दुसरे टोक माणसाला बांधले जाते आणि दोरी डोंगराच्या माथ्यावरून सोडली जाते. याकला भुरळ पाडून त्याला पळविले जाते, ज्यामुळे व्यक्ती दोरीच्या साहाय्याने वेगाने डोंगरावरून खाली सरकतो. याकला (Yak) उत्तेजित करण्यासाठी, स्कीअरला दोरी खेचून हलवावी लागते, तसेच काही पोनी नट्सने भरलेली बादली वाजवावी लागते. यामुळे याक आकर्षित होऊन उत्तेजित होऊन खाली पळतो आणि स्कीअर वर खेचला जातो. हा येथील अतिशय लोकप्रिय खेळ आहे. येथील याक स्पोर्ट्समुळे मनालीला टाइम्स मासिकात "आशियातील सर्वोत्तम" म्हणून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक मनालीला भेट देत असतात. सर्वात जास्त नवविवाहीत जोडपी हनिमूनसाठी मनालीला भेट देण्यासाठी येतात. तसेच हे ठिकाण बौध्द(Buddha) लोकांसाठी प्रसिध्द आहे. मनालीमधील पारंपारिक घर तसेच तेथील वनविहारमधून निघालेली ब्यास नदी अशी अनेक ठिकाण प्रसिध्द आहेत. घनदाट जंगलातून जाणारा रस्ता, हिरवी दरी, मनलीतील रोहतांग खिंडीचे दृश्य, दरीतील देवदाराचे झाड, वन विहारमधून बियास नदी (Bayes river) आणि पर्वतांचे दृश्य, तेथील पर्वतरांगा असे अनेक वेगवेगळे ठिकाणे प्रसिध्द आहेत. अनेक नैसर्गिक घटकांनी वेढलेले, नैसर्गिक आकर्षण आणि अतूलनीय सौंदर्य असे वेगळेपण मनालीला लाभलेले आहे.