Same sex marriage  Team Lokshahi
इतर

Same sex marriage : समलैंगिक विवाह! ताजमहालसमोर केलं प्रपोज, विधिवत लग्नाला घरच्यांचाही पाठिंबा

समलैंगिक विवाह सोहळा. हल्ली सर्रास अशा विवाह सोहळ्याच्या गोष्टी आपल्याला ऐकायला, पाहायला मिळतात. नुकताच असाच एक समलैंगिक विवाह सोहळा पार पडला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

समलैंगिक विवाह सोहळा (Same sex marriage). हल्ली सर्रास अशा विवाह सोहळ्याच्या गोष्टी आपल्याला ऐकायला, पाहायला मिळतात. नुकताच असाच एक समलैंगिक विवाह सोहळा पार पडला आहे.

कोलकाताच्या एका भव्य समारंभात या दोन पुरुषांचं (Gay Marriage) लग्न पार पडलं. विधीवत हे लग्न झालं असून हळदी समारंभापासून (Rituals) सात फेऱ्यांपर्यंत सर्व विधी या लग्नात झाले. त्यांच्या या विवाह सोहळ्याला घरच्यांचा पाठिंबा देखिल मिळाला.

त्यांचे लग्न झाल्यानंतर सर्वच नेटकरी त्यांची लव्हस्टोरी (love story) जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. या नेटकऱ्यांना उत्तर देताना चैतन्य शर्मा आणि अभिषेक रे यांनी आपली लव्ह स्टोरी शेअर केली आहे.

चैतन्यने अभिषेकला ताजमहाल (taj mahal) समोर गुडघ्यावर बसून संपूर्ण जगासमोर प्रपोज( Proposal ) केलं. मार्च २०२० रोजी चैतन्यने अभिषेकला प्रपोज केलं. आणि कोलकाता येथे अत्यंत थाटामाटात, घरच्यांच्या सहमतीने विधीवत लग्नही केलं. तो म्हणाला की आम्हाला आमच्या लग्नासाठी भारत सोडून जायचं नव्हतं. समलैंगिक संबंधाला मान्यता असलेल्या देशात जाऊन लग्न करण्यात रस नव्हता. किंबहुना भारतातच लग्न करून भारतातील समलैगिंक जोडप्यांना प्रोत्साहन द्यायचं होतं, म्हणूनच आम्ही भारतात राहण्याचा निर्णय घेतला.

अभिषेक म्हणाला की, आमची ओळख फेसबूकवर झाली. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखत आहोत. सुरुवातीला आमच्या नात्याला माझ्या घरातून विरोध झाला. मात्र, नंतर आमच्या कुटुंबियांनी हे नातं स्विकारलं. एवढंच नव्हे तर आमच्या मित्र-परिवारानींही या नात्याबाबत विश्वास व्यक्त केला. अभिषेकच्या घरच्यांनीही तत्काळ आमच्या नात्याला परवानगी दिली. असे त्यांनी एका इंग्रजी संकेतस्थळाने घेतलेल्या मुलाखतीत आपली प्रतिक्रिया दिली.

यासोबतच तो म्हणाला की, LGBTQ ला देशभरात अधिकृत मान्यता मिळण्याकरता आम्ही महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. आमच्या या निर्णयामुळे भारतातील अनेक समलैंगिक जोडप्यांना पुढे येण्यास आणि लग्न करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. LGBTQ समजाला मी एवढाच संदेश देईन की त्यांनी हिंमतवान बनावं.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय