रक्षणाबंधन हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. जो श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. भाऊ आणि बहिणीतील बंध जपण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. रक्षाबंधनाला भावासाठी गोडाचा पदार्थ काय करावा असा प्रश्न अनेक स्त्रीयांना पडतो. काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय ओल्या नारळाच्या खीर ची गोड आणि स्वादिष्ट रेसिपी.
नारळाची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
ओलं खोबरं
साखर
सुकामेवा
दूध
केसर
वेलची पूड
रवा
दूध
नारळाची खीर बनवण्याची कृती:
सर्वात आधी गरम पॅनमध्ये तूप घाला. यानंतर त्यात रवा घालून रवा भाजून घ्या, भाजून घेतलेल्या रव्यात काजू, बजाम आणि जो काही सुकामेवा असेल तो बारीक करून घाला. यानंतर त्यात खिसलेले ओले खोबरे भाजून घ्या. सर्व मिश्रण भाजून घेतल्यानंतर त्यात दूध आणि साखर घालून संपूर्ण मिश्रण छान ढवळून घ्या. यानंतर त्यात पून्हा दूध, केसर आणि वेलची पूड घालून संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्या. यानंतर खीर मंद आचेवर शिजवून घ्या. अशा प्रकारे नारळाची खीर तयार होईल