जवसाच्या चटणीसाठी लागणारे साहित्य:
जवसाच्या बिया
मीठ
ऑलिव्ह ऑईल
लाल मिरची
जिरे
चिंच
कोथिंबीर
जवसाची चटणी बनवण्याची कृती:
सर्वात आधी जवसाच्या बिया तेलात भाजून घ्या. यानंतर ते बाजूला काढून पॅनमध्ये जिरे परतून घ्या. भाजून घेतलेल्या जवसाच्या बिया, जिरे आणि चिंच मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता यात मीठ आणि लाल मिरची बारीक करून मिक्स करा. आता या मिश्रणात थोडे पाणी ओता आणि हे मिश्रण पुन्हा मिक्सरमध्ये लावा. आता शेवटी त्यावर कोथिंबीर बारीक करून टाका आणि अशा प्रकारे जवसाची चटणी आंबट आणि झणझणीत चटणी तयार या चटणीचा आस्वाद तुम्ही जेवताना तसेच भाकरी आणि चपातीसोबत घेऊ शकता.