चटकदार

घरच्याघरी तयार करा स्वादिष्ट तिखट पुरणवडी; जाणून घ्या रेसिपी

आषाढ महिना आला की आपल्याला बाहेर फिरायला जाण्याचे, सणावारांचे आणि खाण्यापिण्याच्या गोष्टींचे बेत रंगतात.

Published by : Dhanshree Shintre

आषाढ महिना आला की आपल्याला बाहेर फिरायला जाण्याचे, सणावारांचे आणि खाण्यापिण्याच्या गोष्टींचे बेत रंगतात. पावसाळ्यात असं गरमागरम आणि चमचमीत खायलाही छान लागतं. तर त्या कशा करायच्या यासाठी काही खास टिप्स आज आपण पाहणार आहोत. या पुऱ्या इतक्या छान लागतात की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे त्या खूप आवडीने खातात.

तिखट पुरणवडीसाठी लागणारे साहित्य :

1 वाटी चणाडाळ, 1/2 मूगडाळ, 1/4 वाटी मटकी डाळ, 1/4 वाटी मसूर डाळ, 1/4 वाटी तुरडाळ, 1/4 वाटी तांदूळ, प्रत्येकी छोटा चमचा हिंग, जिरे, ओवा, बडीशेप, धणे, 6-7 हिरव्या मिरच्या, आवश्यकतेनुसार कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना, आले, 5-6 लसूण पाकळ्या, थोडे तीळ, तेल, चवीनुसार मीठ, थोडीशी चिंच, 2 वाट्या गव्हाचे पीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी.

तिखट पुरणवडी बनवण्याची कृती:

वरील सर्व डाळी एकत्र करुन एका मोठ्या पातेल्यात 4 ते 5 तास भिजत ठेवा. त्यानंतर ह्या डाळी स्वच्छ धुवून त्यातील पाणी काढून घ्या. मिक्सरच्या भांड्यात भाजलेले जिरे, धणे, बडीशेप आणि ओवा हे सगळं बारीक करून घ्या. नंतर त्यात हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर, पुदिना आणि कढीपत्ता टाकून बारीक वाटून घ्या. वाटलेले वाटण एका मोठ्या भांड्यात काढून त्यात चवीनुसार मीठ, हिंग, थोडे तीळ घालून ते मिश्रण चांगले एकजीव करून तिखट मिश्र डाळींचे पुरण तयार करून घ्या. आता पोळीसाठी एका परातीत गव्हाचे पीठ चाळणीने चाळून त्यात थोडे मीठ आणि तेलाचे मोहन घालून पीठ मळून घ्या, थोडा वेळ पीठ मुरु द्या.

छोटे छोटे कणकेचे गोळे करून घेऊन त्याच्या एक एक करून पातळ पाऱ्या लाटा. पहिल्या पारीवर तिखट पुरण सर्वत्र पसरून लावा, त्यावर दुसरी पारी ठेवा व पुन्हा पुरण पसरवा. त्यानंतर त्याचा रोल करा. रोल करताना आतून बाहेरून चारही बाजूंना थोडे-थोडे पुरण लावा. याप्रमाणे 2-3 रोल तयार करून घ्या. वाफेच्या चाळणीला तेल लावून त्यात ठेवा. गॅसवर मोठ्या कढईत पाणी, थोडी चिंच किंवा लिंबाचा तुकडा घालून त्यावर स्टैंड ठेवा. त्या स्टँडवर रोलची चाळणी ठेवा. झाकण ठेवून गॅस मंद करा आणि 15-20 मिनिटे चांगले वाफवून घ्या. रोल वाफवून थोडे थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडा. ह्या वाफवलेल्या पौष्टिक वड्या ओले खोबरे व ओल्या शेंगदाण्याच्या चटणी किंवा पुदिना चटणीसोबत तसेच सांबरसोबतही खाऊ शकता. शॅलो/डीप फ्राय करूनही ह्या वड्या खाता येतील.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news