चटकदार

नवरात्रीच्या उपवासात खा पौष्टीक अंजिराचे लाडू; जाणून घ्या सोप्पी रेसिपी

साधारणत: नवरात्रीच्या सणात प्रत्येक जण ९ दिवस उपवास ठेवतो. खूप वेळ न जेवल्यामुळे अनेकांना भूक लागते. अशा परिस्थितीत अंजिराचे लाडू खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Anjeer Laddu Recipe : साधारणत: नवरात्रीच्या सणात प्रत्येक जण ९ दिवस उपवास ठेवतो. खूप वेळ न जेवल्यामुळे अनेकांना भूक लागते. अशा परिस्थितीत अंजिराचे लाडू खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहण्यास मदत होईल. अंजीर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अंजीरचे लाडू जेवढे चविष्ट असतात तेवढेच ते पौष्टिकही असतात. हे लाडू बनवताना अशा कोणत्याही गोष्टींचा वापर केला जात नाही जे तुम्ही उपवासात खाऊ शकत नाही. हे लाडू बनवायला खूप सोपे आहेत आणि तुम्ही ते घरीही सहज बनवू शकता.

साहित्य:

1 कप भिजवलेले अंजीर

1/2 कप खजूर

2 चमचे चिरलेले बदाम

1 टीस्पून खरबूज बिया

1 टीस्पून खसखस

२ चमचे तूप

1/2 टीस्पून वेलची पावडर

१ चिमूट नारळ पावडर

कृती:

अंजीर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी भिजवलेले अंजीर आणि खजूर घालून मिक्सरमधून एकजीव करुन घ्या. कढईत तूप गरम करा. गरम तुपात चिरलेले बदाम, खरबूज आणि खसखस ​​घालून २ मिनिटे भाजून घ्या. नंतर अंजीर आणि खजूर यांच्या मिश्रणात भाजलेले ड्रायफ्रूट्स घालून चांगले मिसळा. आता त्यात वेलची आणि नारळ पावडर घाला. आता हे सर्व मिश्रण थोडं थंड होऊ द्या. नंतर तळहातावर तूप लावून मिश्रणाला गोलाकार आकार द्या आणि तुमचे लाडू तयार आहेत. तुम्ही ते बऱ्याच काळासाठी स्टोअरही करु शकता.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड